सोनम कपूर पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोल 

अभिनेत्री सोनम कपूर पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोल झाली. मुंबईच्या रस्त्यांची दुर्दशा पाहून सोनमने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली. पण या पोस्टमुळेच तिला ट्रोलिंगला सामोरे जावे लागले. मला शहरात पोहोचायला दोन तास लागले. अजूनही मी ट्रॅफिकमुळे पोहोचली नाही. रस्ते खराब आहेत आणि प्रदूषणसुद्धा वाढले आहे. घरातून बाहेर पडणे म्हणजे एखाद्या वाईट स्वप्नासारखे आहे,’ अशी पोस्ट सोनमने लिहिली. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यावर अनंत वासू नावाच्या एका युजरने ट्रोल केल्याने सोनम चांगलीच भडकली.
तुझ्यासारख्या पुरुषांमुळे महिला सार्वजनिक वाहनांचा वापर करण्यास घाबरतात. कारण त्यांना छेडछाडीची भीती असते, असे प्रत्युत्तर सोनमने दिले. सोशल मीडियावर सोनम आणि त्या युजरमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. तुझ्या या वक्तव्याविरोधात मी तुला न्यायालयात खेचू शकतो. कारण मला देशाच्या संविधानावर पूर्ण विश्वास आहे आणि मी तुझ्यासारखा पदवीविना न्यायाधीश नाही, अशा शब्दांत अनंत वासूने सोनमला सुनावले. त्याच्या या उत्तरानंतर नेटकऱ्यांनी सोनमला ट्रोल केले. दरम्यान, याआधीही सोनम कपूरला ट्रोल करण्यात आले होते.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
3 :heart:
5 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
3 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)