न्यूयॉर्कवरून लवकरच भारतात परतणार सोनाली बेंद्रे

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे काही महिन्यांपासून कॅन्सर आजाराशी झगडत आहे. सध्या ती न्यूयॉर्कमध्ये आजारावर उपचार घेत आहे. परंतु आता लवकरच ती भारतात परतणार आहे. याबाबत तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे.

या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आपल्या देशात येणे हे किती खास आहे. काही काळ विश्रांती घेऊन ती पुन्हा पुढील उपचारांसाठी न्यूयॉर्कला पुन्हा जाणार असल्याचेही तिने म्हटले आहे. सोनालीला हायग्रेड कॅन्सर झाला असून तिने स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून याची माहिती आपल्या चाहत्यांना दिली होती.

-Ads-

त्यानंतर ती सोशल मीडियावर सतत ऍक्‍टीव्ह होती. आपल्यावरील उपचारांचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून आता आपल्याला मायदेशात जाण्यास डॉक्‍टरांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे मी खूप खुश आहे असे सोनालीने या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे.

आपल्या घरापासून दूर न्यूयॉर्कमध्ये राहताना तिची मानसिक स्थिती कशी झाली याबद्दल तिने लिहीले आहे. मात्र या अंतराने मला अनेक गोष्टी शिकवल्या. आता मी घरी येत असून मला होत असलेला आनंद मी शब्दात व्यक्त करु शकत नाही. आपला परिवार आणि मित्रमंडळींना भेटणे ही खऱ्या अर्थाने आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे मी खूप उत्साही आहे, असेही तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)