कॅन्सरग्रस्त सोनाली बेंद्रेने मुलाच्या वाढदिवसानिमित्त शेअर केला भावूक व्हिडीओ

नवी दिल्ली – बाॅलीवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे ही कॅन्सर आजाराशी लढा देत आहे. ती सध्या न्यूयाॅर्कमध्ये उपचार घेत आहे. कॅन्सर झाल्यापासून सतत ती आपल्या तब्येतीविषयीची माहिती सोशल मीडियावर देत असते. तर कधी ती तिच्या आठवणी देखील शेअर करत असते.

सोनालीचा मुलगा रणवीर याचा आज 13 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने तिने इंस्टाग्रामवर एका भावनिक संदेशासह एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये सोनाली हिने मुलगा रणवीर याच्यासोबत घालवलेल्या चांगल्या आठवणीचे फोटो कलेक्ट करून व्हिडीओव्दारे दाखवले आहे.

-Ads-

तसेच व्हिडीओसोबत एक भावनिक संदेश सुध्दा लिहला आहे. त्यामध्ये ती लिहते, ” रणवीर, मी तुला सांगू शकत नाही की, मला तुझ्याबदल किती अभिमान आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा. अस पहिल्यांदा घडतय की, तुझ्या वाढदिवसादिवशी मी तुझ्यासोबत नाही. मला तुझी कमी जाणवते आणि आठवण ही येते. तुला खूप सारं प्रेम. मी नेहमीच तुझ्यावर प्रेम करीत राहील….तुला अलिंगण “.

What is your reaction?
5 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)