सोनाली बेंद्रे मायदेशी परतली

बॉलीवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे पाच महिन्यांनी मायदेशी परतली आहे. अमेरिकेत तिच्यावर कॅन्सरवरील उपचार सुरू होते. सोनाली बेंद्रे सोमवारी पहाटे तीन वाजता मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाली. यावेळी सोनालीचा पती गोल्डी बहल तिच्यासोबत हजर होता.

“आता उपचार संपले असून सोनालीच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. परंतु हा आजार पुन्हा उफाळू शकतो. त्यामुळे नियमित तपासणी करावी लागेल, अशी माहिती गोल्डी बहल याने यावेळी दिली.”

सोनालीने जुलै महिन्यात तिला हायग्रेड कॅन्सर झाल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. यासाठी गेल्या पाच महिन्यांपासून अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये हायग्रेड कॅन्सरवर उपचार घेत होती. दरम्यानच्या काळात सोनालीने सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर केले होते. कालही सोनालीने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करुन भारतात परतणार असल्याची माहिती दिली होती.

दरम्यान, दुरावा आपल्याला खूप काही शिकवतो. घरापासून दूर राहिल्यानंतर मला हे जाणवले की मला अनेक लोकांच्या गोष्टी समजल्या. सर्वजण आपले जीवन वेगवेगळ्या पद्धतीने रेखाटण्याचा प्रयत्न करतात. सोबतच सर्वजण संघर्षही करत आहेत. कुणीही हार मानत नाही, अशी पोस्ट सोनालीने इन्स्टाग्रामवर लिहिली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)