सोनालीची तब्येत स्थिर आहे : गोल्डी बहल

कॅन्सर झाल्याचे कळल्यानंतर अभिनेत्री सोनाली बेंद्रे सोशल मीडियावर खूपच सक्रीय झाली आहे. वेळोवेळी सोशल मीडियाव्दारे ती  आपल्या तब्येतीविषयीची माहिती आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत आहे.

कॅन्सरशी लढा देत असलेली अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिचा पती गोल्डी बहल याने माहिती दिली आहे की, सोनालीची तब्येत आता स्थिर आहे आणि कोणत्याही अडचणीशिवाय तिच्यावर उपचार चालू आहेत. याबदल त्याने गुरूवारी ट्वीट करत सोनालीच्या तब्येतीविषयी माहिती दिली.

-Ads-

त्याने ट्वीट करत म्हटले की, सोनालीविषयी तुम्ही दाखविलेल्या प्रेमाबदल आणि समर्थनासाठी तुम्हा सर्वाचे आभार. सोनालीची तब्येत आता स्थिर आहे, तिच्यावर उपचारही व्यवस्थित होत आहेत. हा एक लांबचा प्रवास आहे, याची सुरूवात आम्ही सकारात्मकतेने केली आहे.

सोनाली वर न्यूयाॅर्क मध्ये मेटास्टैटिक कॅन्सरवर उपचार चालू आहेत. जुलैमध्ये सोनालीने आपल्याला हाई-ग्रेड कॅन्सर असल्याचे सोशल मीडियाव्दारे चाहत्यांना सांगितले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)