‘सोनाली बेंद्रे’च्या निधनाच्या अफवेमुळे तिचा पती संतापला, लोकांना केले ‘हे’ आवाहन

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या मेटास्टैटिक कॅन्सरशी झुंज देत असून तिच्यावर न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरु आहेत. शुक्रवारी तिच्या निधनाबदल अफवा पसली होती. ही बातमी सोनालीचा पती गोल्डी बहल याच्यापर्यंत पोहचली आणि त्यानंतर त्याने यावर संताप व्यक्त केला आणि लोकांना ट्विट करत एक आवाहन केले.

दरम्यान, भाजपाचे आमदार राम कदम यांनी सोनाली बेंद्रे हिच्या निधनाचे चुकीचे ट्विट केले होते. चुकीचे ट्विट केल्याने लोकांकडून ट्रोल झाल्यानंतर कदम यांनी ते चुकीचे ट्विट हटवले. या अफवेबदल सोनालीचा पती गोल्डी बहल याने संताप व्यक्त केला आहे. गोल्डी याने ट्विटरवर अशी बातमी पसरवणाऱ्या लोकांना चांगलच सुनावल आहे.

गोल्डी बहल याने ट्विट करत म्हटलं आहे की, ‘मी लोकांना आवाहन करतो की, कृपया सोशल मीडियाचा वापर जबाबदारीनं करा. अफवेवर विश्वास ठेवू नका आणि त्याची शहानिशा न करता ती अफवा पसरवून संबंधितांना त्रास देऊ नका’. धन्यवाद.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)