कॅन्सरशी लढा देत असलेली सोनाली पहिल्यांदा दिसली ‘बाल्ड’ लूकमध्ये

मैत्रीदिनाच्या दिवशी झाली भावूक

मैत्रीदिनाच्या अौचित्यानिमित्त कॅन्सरशी लढा देत असलेली सोनाली बेंद्रे हिने आपल्या जवळच्या मैत्रिणीसोबत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सोनाली पहिल्यांदा ‘बाल्ड लूक’ मध्ये दिसत आहे.

-Ads-

सध्या बाॅलीवूड अभिनेत्री सोनाली न्यूयाॅर्क मध्ये मेटास्टेटिक कॅन्सरवर उपचार घेत आहे. कॅन्सर झाल्याचे कळल्यापासून सोनाली सतत सोशल मीडियाव्दारे तिच्या चाहत्यांना तिच्या तब्येतीविषयी अपडेट देत असते.

काही दिवसापूर्वी तिने स्वत:चे लांब केस कापले होते आणि बाॅयकट हेयरस्टाईल मध्ये फोटो टाकला होता. त्यानंतर तिने आज बाल्ड लूक मधील फोटो शेअर केला आहे. मैत्रीदिनानिमित्त तिने जवळच्या मैत्रिणी गायत्री जोशी आणि सुजान खान यांच्यासोबत फोटो शेअर केला आहे. यामध्ये तीघीजणी एका रेस्टाॅरंट बाहेर बसलेल्या दिसत आहेत. या फोटोमध्ये सोनाली पहिल्यांदा ‘बाल्डलूक’ मध्ये दिसत आहे.

सोनालीने या फोटोला एक कॅप्शन दिले आहे. तिने म्हटले आहे की, माझ्या चांगल्या आणि वाईट काळात मला नेहमीच साथ दिल्याबदल धन्यवाद. पुढे ती म्हणते की, कॅन्सरच्या आजारामुळे मला खूप दु:ख सहन करावे लागले पण माझ्या आयुष्यात चांगले मित्र-मैत्रिणी असल्याने ते नेहमी माझ्यासोबत नेहमी राहिले. यादरम्यान तिने #BaldIsBeautiful हा हॅशटॅग वापरला आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)