सोनाली-प्रियांकाने घेतली ऋषि कपूरची भेट 

बॉलीवूडमधील दिग्गज अभिनेता ऋषि कपूर सध्या न्यूयॉर्क येथे वैद्यकिय उपचार घेत आहेत. याबाबत त्यांनी स्वतः 29 सप्टेंबरला ट्‌वीट करून माहिती दिली होती. काही दिवसांपूर्वीच अनुमप खेरने त्यांची भेट घेतली होती. आता प्रियांका चोप्रा आणि सोनाली बेंद्रेने त्यांची भेट घेतली आहे. 

प्रियांकाने ऋषि-नीतू कपूर सोबतचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत लिहिले की, तुम्हा दोघांना भेटून खूपच आनंद वाटला. तुम्ही आनंदी आणि हसत राहो, हिच इच्छा. दुस-या एका फोटोत ऋषि-नीतू, सोनाली बेंद्रे आणि गोल्डी बहल हे एकत्रित दिसतात. अभिनेत्री सोनाली बेंद्रेवरही न्यूयॉर्कमध्येच कॅन्सरवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे तिलाही बॉलीवूडमधील कलाकार भेटण्यासाठी येत असतात. 

-Ads-

ऋषि कपूरच्या आजाराबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. असेही म्हटले जात आहे की, त्यांना तिस-या स्टेजमधील कॅन्सर डिजेस्ट झाला आहे. मात्र, रणधीर कपूरने त्यांच्या आरोग्याबाबत वर्तविण्यात आलेले सर्व तर्क-वितर्क फेटाळून लावले आहे. रणधीर म्हणाला, ऋषि कपूर यांची प्रकृती एकदम स्थीर आहे. सध्या त्यांच्या टेस्ट सुरू असून त्यातून जोपर्यत काही स्पष्ट होत नाही. तोपर्यत त्यांना निश्‍चित काय झाले आहे, हे सांगू शकत नाही. 

दरम्यान, उपचार सुरू असल्यामुळे ऋषि हे आपली आई कृष्णा राज कपूर यांच्या अंतिम संस्कारालाही उपस्थित राहू शकले नाहीत. सध्या ऋषि कपूरसोबत न्यूयॉर्कमध्ये नीतू कपूर आणि रणबीर कपूर आहेत. 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)