सोनाक्षी सिन्हाचे नवीन ऍक्‍टरबरोबर डेटिंग

मागील वर्ष बॉलिवूडमध्ये लग्नसराईचे वर्ष होते. आता 2019 वर्षात देखील बरीच लग्न व अफेयरच्या चर्चा ऐकायला मिळू शकतात. सध्या बॉलिवूडमधील काही जोड्या आपल्या रोमॅंटिक लाईफबद्दल चर्चेत आहेत. खर्या आयुष्यात रोमान्स
करणाऱ्या कलाकारांच्या यादीत आता सोनाक्षी सिन्हाच्या नावाचा देखील समावेश झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सोनाक्षी सध्या नवोदित अभिनेता जहीर इक्‍बालसोबत रोमान्स करते आहे. जहीर हा सलमान खान फिल्म प्रोडक्‍शनच्या नोटबुकमधून यावर्षी 2019मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

या सिनेमात मोहनीश बहलची मुलगी प्रनूत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सोनाक्षी व जहीर सलमानमुळे एकमेकांना भेटले. अद्याप ते दोघे लोकांसोर एकत्र आलेले नाहीत. सोनाक्षी आधी बंटी सचदेवासोबत रिलेशनशीपमध्ये होती. पण याचवर्षी फ्रेब्रुवारीत दोघांचेही ब्रेकअप झाले. खरे तर दोघांचेही रिलेशन लग्नापर्यंत पोहोचणार असे मानले जात होते. पण अचानक त्यांच्या ब्रेकअपची खबर आली. बंटीनंतर सोनाच्या आयुष्यात जहीरने एन्ट्री घेतली आहे. या वर्षात नव्या जोड्यांमध्ये यांचा देखील समावेश असेल असे बोलले जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)