सोनाक्षी सिन्हाची ऍमेझॉनकडून फसवणूक

सध्या आधुनिक युगात मानवी जीवनशैलीत मोठया प्रमाणात बदल घडत आहे. त्यातच इंटरनेट आणि मोबाईलमुळे ई-कॉमर्सची मोठी बाजारपेठ निर्माण झाली आहे. या ई-कॉमर्स साईटवरुन खरेदी करताना अनेकवेळा फसवणूक होत असल्याचे प्रकार घडत असतात. अशाच काहीसा प्रकार अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्यासोबत घडला आहे.

ई-कॉमर्स साइटवरून खरेदी करताना ग्राहकांना मोठा फटका बसल्याचे दिसून आले आहे. साबणाची वडी, दगड अशा वस्तू महागड्या वस्तूंच्या बदल्यात बॉक्‍समध्ये येण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. अशा मोठमोठ्या साइटवरुन खरेदी करण्याचे वाईट अनुभव सर्वसामान्य माणसांना आल्याच्या कित्येक बातम्या आपण वाचल्याही असतील असाच वाईट अनुभव अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या देखील वाट्याला आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ऍमेझॉन या लोकप्रिय इ कॉमर्स साइटवरुन सोनाक्षीने एका महागड्या ब्रॅंडचे हेडफोन्स मागवले. सोनाक्षीने ऑर्डर मिळाल्यानंतर जेव्हा बॉक्‍स उघडून पाहिला तेव्हा त्यात हेडफोन्सच्या बदल्यात लोखंडी नळाचा तुकडा होता.
याबद्दल सोनाक्षीने ट्‌विट करत ऍमेझॉनकडे तक्रार केली आहे. तसेच तिने ऍमेझॉनच्या ग्राहक सेवेवरही नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी तक्रार करूनही कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले नसल्याचेही सोनाक्षीने आपल्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)