फसवणूकीच्या गुन्ह्यात अडकली सोनाक्षी सिन्हा

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा कायद्याच्या कचाट्यात अडकताना दिसून येत आहे. त्याचे झाले असे की, सोनाक्षीला एका कार्यक्रमात परफॉर्म करायचा होता. हा कार्यक्रम 30 सप्टेंबर 2018 रोजी दिल्लीत होणार होता. पण ऐनवेळी सोनाक्षीने त्यास नकार दिला. याप्रकरणी सोनाक्षीसह अन्य काही जणांविरोधात मुरादाबाद येथे तक्रार नोंदविण्यात आली आहे.

मुरादाबाद येथील इंडिया फॅशन ऍण्ड ब्यूटी अवॉर्डचे मालक प्रमोद शर्मा हे सोनाक्षीला कार्यक्रमात परफॉर्म करण्यासाठी 37 लाख रुपये देण्यास तयार झाले होते. पण शेवटच्या क्षणी तिने नकार दिल्याने कंपनीचे आर्थिक नुकसान झाले. तसेच तिच्या राहण्यासाठी आणि प्रवासासाठी अतिरिक्‍त 9 लाख रुपयेही खर्च केले, असा दावाही केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या कार्यक्रमास सोनाक्षी उपस्थित न राहिल्याने नागरिकांची निराशा झाली आणि हा कार्यक्रमही रद्‌द करावा लागला. यामुळे आयोजकांना मोठा आर्थिक फटका बसला. याबाबत सोनाक्षीसह अन्य तीन आरोपिंची चौकशी करण्यात येणार आहे.
दरम्यान, सोनाक्षीने अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही. सध्या सोनाक्षी आगामी “दबंग 3’ची शूटिंग सुरू करण्याच्या तयारीत आहे. तसेच नुकताच प्रदर्शित झालेल्या “टोटल धमाल’मधील तिचे आयटम सॉन्ग “मुंगडा’ हे चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)