शत्रुघ्न सिन्हा यांच्या काँग्रेस प्रवेशावर सोनाक्षी म्हणते…  

मुंबई – भाजप नेतृत्वावर उघड टीका केल्याने पक्षश्रेष्ठींनी शत्रुघ्न सिन्हा यांचे लोकसभेचे तिकीट कापले आहे. यामुळे शत्रुघ्न सिन्हा नाराज झाले असून लवकरच काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे वृत्त सध्या चर्चेत आहे. या निर्णयाचे सोनाक्षी सिन्हाने खुले समर्थन दिले आहे. त्यांनी याआधीच भाजप पक्ष सोडायला हवा होता, असेही मत सोनाक्षी सिन्हाने व्यक्त केले आहे.

सोनाक्षी सिन्हाने म्हंटले कि, मला वाटते कि त्यांना हे खूप आधीच करायला हवे होते. त्यांना योग्य सन्मान तेथे मिळत नव्हता. मला वाटते कि, तुम्ही जर आनंदी नसाल तर तुम्ही बदल आणला पाहिजे. हेच त्यांनीही केले. माझे वडील सुरुवातीपासूनच पक्षाशी जोडलेले आहेत. अटलजी, अडवाणी यांच्या काळापासून ते पक्षात आहेत, परंतु, पक्षाने त्यांचा योग्य तो सन्मान दिला नाही. माझ्या मतानुसार, त्यांनी खूप उशीर लावला. त्यांनी हे आधीच करायला पाहिजे होते, असे तिने म्हंटले आहे.

दरम्यान, परिस्थिती काहीही असो निवडणूक ‘पटणा साहिब’मधूनच लढवणार, असा निर्धार शत्रुघ्न सिन्हा यांनी बोलून दाखवला आहे.अशातच शत्रुघ्न सिन्हा यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली असून लवकरचं काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)