जिर्णोद्धार कामासाठी निधी कमी पडू देणार नाही

सुभाष मुथा : सोनईच्या मंदिरास जैन मंदिराची 18 लाख 18 हजार रुपयांची देणगी

नगर – सोनईच्या श्री. आदेश्‍वर जैन मंदिरास नगरच्या कापड बाजार जैन मंदिराने 18 लाख 18 हजारांची देणगी दिली आहे. मंदिराचे अध्यक्ष सुभाष मुथा यांनी सोनई मंदिराच्या अध्यक्षांना नुकताच देणगीचा धनादेश दिला.

सोनईचे श्री आदेश्‍वर जैन मंदिर अतिशय जुने आहे. स्व.आचार्य यशोदेवसुरिश्‍वरजी महाराजांच्या उपस्थितीत 60 वर्षांपूर्वी याची उभारणी झाली. सध्या मंदिराचे जिर्णोद्धाराचे काम सुरु आहे. अतिशय सुंदर असे मंदिर सोनईत उभे राहत आहेत. यासाठी मोठ्या निधीची गरज आहे. ते लक्षात घेऊन नगरच्या कापड बाजार जैन मंदिराने 18 लाख 18 इतकी भरीव आर्थिक मदत या मंदिरास दिली आहे.

कापड बाजार जैन मंदिरात एका छोटेखानी कार्यक्रमात मंदिराचे अध्यक्ष सुभाष मुथा यांनी नगरचे जैन मंदिर हे जिल्ह्यातील सर्वात मोठे मंदिर आहे. मोठ्या भावाच्या कर्तव्य भावनेतून आम्ही ही मदत केली असून, यापुढेही जिर्णोद्धार पूर्ण होईपर्यंत सोनई मंदिराला पैसा कमी पडू देणार नाही. नगरच्या जैन मंदिराने यापूर्वी जिल्ह्यातील आणि राज्यातील जैन मंदिरांना मोठी आर्थिक मदत केल्याचिं मुथा म्हणाले.

यावेळी नगरचे विश्‍वस्त विनोदभाई शहा, सीए राजेश शहा, मणिकांत भाटे, किशोर भंडारी आदि उपस्थित होते. सोनईचे अध्यक्ष अशोक भळगट यांनी चेक स्विकारला. सोनईचे विश्‍वस्त अमृतलाल भळगट, डॉ.दिलीप भळगट, संजयकुमार भळगट, संजयभाई शाह, अनिलभाई मेहेर, ओंकारनाथ भळगट, मुलचंद भळगट आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)