मुंबई- बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका ‘सोना मोहापात्रा’ला अभिनेता सलमान खानच्या एका चाहत्याने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. सोना मोहापात्रा ही नेहमीच सामाजिक माध्यमांवर स्वतःची मते मोकळेपणाने मांडत असते. तसेच बॉलिवूडमधील न पटणाऱ्या कलाकारांविरोधात सुद्धा ती ट्विटर अकाउंटवरून आपले मत मांडत असते.
From ‘Slut I’ll kill you’ to ‘Sona Mam’.
A journey of toxic intimidation to ‘being intimidated’ within 24 hours?
I’m guessing he figured that #India would find & thrash him soon enough.
Dear followers of bhai the bully, please read the writing in the wall. Your time is UP. 🔴 pic.twitter.com/TxcLlm25lM— Sona Mohapatra (@sonamohapatra) May 29, 2019
दरम्यान, सोनाने काही दिवसांपूर्वी असंच एक वादग्रस्त ट्विट सलमान खान विरोधात केलं होत. मात्र, तिने केलेल्या या ट्विटने आता एक वेगळेच वळण घेतले आहे. या ट्विटमुळे सलमानच्या एका चाहत्याने सोनाला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तिने आलेल्या धमकीचा स्क्रिनशॉट ट्विटवर शेअर केला असून, याबद्दल आपले मत व्यक्त केले आहे.”वाईट वर्तणुकीसाठी प्रसिद्ध असलेल्या या हिरोच्या चाहत्यांकडून मला अशाप्रकारे धमकावणारे मेसेज नेहमीच येत असतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मानवी मूल्यांचा शत्रू असलेला हा हिरो सध्या ‘भारत’ हे शीर्षक घेऊन सर्वत्र मिरवत आहे”. असं सोनाने म्हंटल आहे.