असेही काही

दरवेळच्या निवडणुकांनंतर आकड्यांची गणितं सोडवण्याचा आणि शोधण्याचा प्रयास सुरू होतो. यातूनच सर्वाधिक मताधिक्‍याने निवडून आलेल्यांची जशी माहिती पुढे येते तसे त्या-त्या वेळच्या निवडणुकांमध्ये सर्वांत कमी फरकाने विजयी झालेल्या उमेदवारांचाही शोध लागतो. 1962 पासून 2009 पर्यंतच्या अशाच उमेदवारांविषयी आपण जाणून घेऊया.
1962 मध्ये मणिपूरमधील मतदारसंघातून सोशालिस्ट या पक्षाचे रशिंग नामक उमेदवार देशात सर्वांत कमी फरकाने विजयी झाले. त्यांना आपल्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा केवळ 42 मते जास्त पडली होती.

1967 च्या निवडणुकीत हरियाणातील भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या कर्नाल मतदारसंघातील एम. राव यांचा केवळ 203 मताधिक्‍याने विजय झाला होता.

1971 मध्ये महाराष्ट्रातील शेतकरी कामगार पक्षाचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार दाजिबा बळवंतराव देसाई यांचा अवघ्या 165 मतांनी विजय झाला होता. 1980 मध्ये उत्तर प्रदेशातील देओरिया मतदारसंघातील भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे उमेदवार राम्यन रवी यांनी प्रतिस्पर्ध्यावर केवळ 77 मतांनी मात करत विजय नोंदवला होता. 1984 मध्ये पंजाबमधील लुधियाना लोकसभा मतदारसंघातील शिरोमणी अकाली दलाच्या मेवा सिंग या उमेदवाराला प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा केवळ 140 मते अधिक मिळाली आणि ते विजयी झाले. त्या निवडणुकांमध्ये सर्वात कमी मताधिक्‍याने विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये ते अव्वल होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)