१७ वर्षानंतर असे काही लॉर्ड्स वर घडले की सचिन तेंडुलकरला देखील पाहावी लागतेय वाट

क्रिकेटची पंढरी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर एक खूप जुनी आणि वेगळी प्रथा आहे. सामना सुरु होण्याच्या अगोदर येथे सामन्याची सुरुवात म्हणून बेल (घंटा) वाजवण्याची प्रथा आहे. यावेळी हा मान सर्वकालीन महान खेळाडू सचिन तेंडुलकर याला मिळणार आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेच्या दुसरा कसोटी सामना लॉर्ड्सवर होत आहे. पहिल्या दिवशीचा पूर्ण खेळ हा पावसामुळे वाया गेला आहे. पावसाने खेळाडूंना मैदानात उतरण्याची आणि सचिनला ती ऐतिहासिक बेल वाजवण्याची संधी देखील दिली नाही.
इंग्लंडचे वातावरण हे खूप नखरेल आहे हे सर्वांना माहिती आहे. तेथे कधी हलक्या सरी कोसळतील हे कोणी सांगू शकत नाही. परंतु मोठा पाऊस पडून पडून लॉर्ड्सच्या मैदानावरचा अख्खा दिवस वाया जाण्याची ही घटना तब्बल १७ वर्षांनी घडली आहे.
२००१मध्ये  इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील कसोटी सामन्याच्यवेळी ही लॉर्ड्स मैदानावरील संपूर्ण दिवस पावसामुळे वाया गेला होता. २४ ऑगस्ट २०१३ नंतर इंग्लंड मधील कसोटी सामन्यात पूर्ण दिवस वाया जाण्याची ही पहिलीच वेळ

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)