राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते पक्ष सोडण्याच्या तयारीत?

कोथरुड – सध्या कोथरुड मधील स्थानिक पातळीवर राजकीय घडामोडी मोठ्या प्रमाणावर होताना दिसत असून कोथरुड कर्वेनगर मधील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे काही कार्यकर्ते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहे.

राष्ट्रवादीच्या काही महिला पदाधिकाऱ्यांनी महायुतीचा घटक पक्ष असणाऱ्या शिवसंग्राम संघटनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यातील काही महिला पदाधिकारी या कोथरुड परिसरात राहणाऱ्या आहेत. आता काही पदाधिकारी व कार्यकर्ते ही पक्ष सोडणार असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे.

राष्ट्रवादीचे पदाधिकारी व काही कार्यकर्ते भाजपच्या तर काही शिवसंग्राम संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या व नेत्यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात असून तशा बैठकाही झाल्या असल्याची माहिती मिळत आहे. यात महापालिका निवणुकीत व पक्षाची पदे देताना अन्याय झालेल्या कार्यकर्त्यांचा समावेश असण्याची शक्‍यता आहे. पुढील पक्षाकडून काय आश्‍वासन मिळते आहे याची आता वाट पाहिली जात आहे. आता कोण भाजपमध्ये व कोण शिवसंग्राममध्ये जाणार का ही केवळ चर्चाच राहणार हे पहावे लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)