मध्य प्रदेशात काही बॅंकांतील कर्जांना माफी नाही-शेतकरी चिंतित

संग्रहित फोटो

होशंगाबाद (मध्य प्रदेश) :मध्य प्रदेश सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली असली, तरी काही बॅंकांकडून घेतलेल्या कर्जांना माफी नसल्याने शेतकरी चिंतित झाले आहेत. मंगळवारी आयसीआयसीआय आणि एचडीएफसी या दोन बॅंकांत खाती असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर संबधित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकड़े तक्रार नेली. जिल्हाधिकारी आशिष सक्‍सेना यांनी या दोन बॅंकांचा कर्जमाफी योजनेत समावेश नसल्याचे स्पष्ट करताच सुमारे दीडशे शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरले.

कर्जमाफी न मिळाल्यास सरकारच्या या दुटप्पी धोरणाबाबत मोठे आंदोलन छेडण्याचे शेतकऱ्यांनी जाहीर केले. हा सरकारचा धोरणात्मक निर्णय असल्याने या बाबतीत आता काही करता येणार नाही, पण तुमच्या समस्या सरकारपर्यंत नेल्या जातील असे आश्‍वासन देऊन जिल्हाधिकारी आशीष वर्मा यांनी शेतकऱ्यांची समजूत घातली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)