आरक्षणावर तोडगा काढा,अन्यथा उद्रेक

खा.उदयनराजेंचा इशारा:सर्वच सरकारांचे मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष
पुणे,दि.5 (प्रतिनिधी)- आजी-माजी सरकारने दुर्लक्ष केल्यामुळेच मराठा आरक्षणाचा प्रश्‍न चिघळला आहे. सोयीच्या राजकारणामुळेच आरक्षणासाठी आत्तापर्यत बळी गेले आहेत, असा आरोप खासदार उद्‌यनराजे भोसले यांनी आज येथे केला.मराठा आरक्षणावर तातडीने तोडगा काढा अन्यथा उद्रेक होईल असा इशाराही उद्‌यनराजे भोसले यांनी यावेळी दिला.

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाच्यावतीने राज्यभरात आंदोलने सुरु आहेत. या पार्श्‍वभूमीवर आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी आज मराठा आरक्षण परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी खासदार उद्‌यनराजे भोसले होते. परिषदेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते, या परिषदेला राज्यातील शंभरहून अधिक समन्वयक उपस्थित होते. आरक्षणाबाबत निर्णय होईल व लोकांनी आत्महत्या व तोडफोड-जाळपोळ करु नये असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.

-Ads-

ते म्हणाले,सोयीच्या राजकारणामुळे आजपर्यत अनेक बळी गेले आहेत, मुलभूत अधिकारांसाठी भिकाऱ्यासारखे फिरण्याची वेळ आली आहे. वेळीच आरक्षण दिले असते तर आयोगाची गरज भासली नसती, आरक्षणाबाबत सरकारने वेळकाढूपणा करु नये लोकांना तुमच्याकडून अपेक्षा आहेत. सरकारने आरक्षणाबाबत सुरु असणारा संगीतखुर्चीचा खेळ सोडून द्यावा तसेच याबाबत मौन ही बाळगू नये.आम्हाला न्याय हातात घ्यायला लावू नका त्याला सरकारच जबाबदार असेल त्यानंतर जी काही परिस्थिती निर्माण होईल त्याला सामोरे जाण्याची तयारी ठेवा असा इशारा ही उद्‌यनराजे भोसले यांनी दिला.

कायद्याचे कारण पुढे करत आरक्षणाचा प्रश्‍न प्रलबिंत ठेवू नका आज 80 टक्के मराठा समाज हा शेतीवर अवलंबून आहे.त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, आथिर्क परिस्थितीचा विचार केला पाहिजे. मराठा समाजात मागासांची संख्या अधिक आहे.मागील तीस वर्षापासून आरक्षणावर फक्त चर्चाच सुरु आहे, आरक्षणाच्या मुद्यांवर एवढी चर्चा कशाला,समिती, आयोग यातच अनेक वर्षे वाया गेली आहेत. संपूर्ण एक पिढी उमेदीच्या काळात वंचित राहिली आणि दिशाहीन झाली आहे.असे ही त्यांनी सांगितले.

यावेळी उद्‌यनराजे भोसले यांनी सर्व राज्यकर्त्याना कळकळीची विनंती करत आरक्षणाच्या प्रश्‍नावर तातडीने तोडगा काढा, कागदी घोडे नाचवू नका मराठा समाजाला आरक्षण द्यायचे आहे की नाही याबाबत सरकारने स्पष्ट सांगून टाकावे उगीच वेळकाढूपणा करु नये अन्यथा उद्रेक होईल असा इशाराही दिला.
दरम्यान आज दिवसभर झालेल्या मराठा आरक्षण परिषदेमध्ये समन्वयकांनी केलेल्या सूचना ऐकून घेण्यात आल्या आहेत. या सूचनांचे एक निवेदन आपण मुख्यंमत्र्यांना पाठविणार असल्याचे ही त्यांनी संगितले.

उद्‌यनराजे भोसले काय म्हणाले,
मराठा आरक्षणाबाबत निर्णय होईल
आत्महत्या व तोडफोड करु नका
आरक्षणाबाबत कागदी घोडे नाचवू नये
तीस वर्षापासून केवळ चर्चाच होत आहे.

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)