सिंधूचे रौप्यपदकावरच समाधान; कॅरोलिन मरिनला जेतेपद

नानजिंग: चीन येथिल नानजिंह येथे सुरु असलेल्या जागतिक अजिंक्‍यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूला स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्पेनच्या कॅरोलिना मरीन हिने 21-19, 21-10 असे पराभूत करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावताना सुवर्णपदकाची कमाई केली. पहिल्या गेममध्ये विजयासाठी मरीनला सिंधूने चांगलेच झुंजवले. सिंधूने सुरुवातीला 6-4 अशी आघाडी घेतली होती. पण नंतर गेम अत्यंत अटीतटीचा झाला. मरीनने आपला झुंजार खेळ दाखवत पहिला गेम 21-19 असा जिंकला. दुसऱ्या गेममध्ये मात्र सिंधू सपशेल अपयशी ठरली. तिने तो गेम तब्बल 11 गुणांच्या फरकाने गमावला. त्यामुळे सिंधूला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
पहिला गेम सिंधूने हातातला गमावला. पहिल्या गेममध्ये सिंधूने 14-9 अशी दमदार आघाडी घेतली होती. पण त्यानंतर मरिनने सामन्यात जोरदार पुनरागमन केले. त्यानंतर मरिनने गुण मिळवण्याचा सपाटा लावला. मरिनने सहा गुणांची कमाई करत सिंधूशी 15-15 अशी बरोबरी केली. त्यानंतर दोघींनीही जोरदार आक्रमण लगावत 18-18 अशी बरोबरी साधली. पण त्यानंतर पुन्हा एकदा मरिनने सर्वोत्तम खेळाची प्रचिती आणून देत 21-19 असा पहिला गेम जिंकला. पहिला गेम पिछाडीवरुन जिंकल्यावर मरिनचे मनोबल कमालीचे उंचावले. दुसऱ्या गेममध्ये मरिनने सिंधू निष्प्रभ केले. दुसऱ्या गेममध्ये मरिनच्या खेळापुढे सिंधू हतबल झाली आणि त्यामुळे तिला रौप्य पदकावरच समाधान मानावे लागले.
सिंधूने गेल्यावर्षी झालेल्या या स्पर्धेत रौप्यपदक पटकावले होते. गेल्यावर्षी झालेल्या स्पर्धेत सिंधू अंतिम फेरीत पोहोचली होती, पण तिला जेतेपद पटकावता आले नव्हते. त्यापूर्वी 2013 आणि 2014 या वर्षांमध्ये सिंधूला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. या सामन्यापूर्वी सिंधू आणि मरिन यांच्यामध्ये 12 सामने झाले होते. या दोघींनीही 12 पैकी प्रत्येकी सहा सामने जिंकले होते.
तत्पूर्वी, उपांत्य फेरीत जपानच्या अकाने यामागुची हिचा सिंधूने 21-16, 24-22 असा पराभव केला. सामन्यातील पहिला गेम संघर्षपूर्ण झाला, पण तो सिंधूने 21-16 अशा फरकाने जिंकला. दुसऱ्या गेममध्ये यामागुची हिने 19-12 अशी आघाडी घेतली होती. पण नंतर सिंधूने धमाकेदार कमबॅक करत 20-20 अशी बरोबरी साधली. सामना अत्यंत रंगतदार झाला. अखेर सिंधूने 24-22 असा गेम जिंकत स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
त्याआधी उपांत्यपूर्व फेरीत सिंधूने जपानच्या नोझुमी ओकुहारा हिचा 21-17, 21-19 असा पराभव केला होता. या विजयाबरोबरच ओकुहाराने मागील स्पर्धेत तिच्या केलेल्या पराभवाचा वचपा काढला. थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताच्या पी. व्ही. सिंधूला पराभवाला सामोरे जावे लागले होते. जपानच्या नोझुमी ओकुहाराने सिंधूचा 21-15, 21-18 असा सरळ गेममध्ये पराभव केला होता. त्या पराभवाचा वचपा सिंधूने काढला होता.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)