पाच गावांमध्ये सौरदिव्यांचा प्रकाश

आळेफाटा – बेल्हे- राजुरी (ता. जुन्नर) जिल्हा परिषद गटातील पाच गावांमध्ये सौर दिवे बसविण्यात आले असल्याची माहिती भाजपच्या पुणे जिल्हा महिला मोर्चाच्या सरचिटणीस सुनंदा गाडगे यांनी दिली. जिल्ह्याचे पालकमंत्री गिरिष बापट यांच्या जिल्हा नियोजनाच्या विशेष निधीतून या गटातील पारगाव तर्फे आळे, निमगाव सावा, जाधववाडी, रानमळा व सुलतानपूर या पाच गावांमधे हे सौरदिवे नुकतेच बसविण्यात आले आहेत.

या गावांच्या परिसरामध्ये बिबट्याचे वास्तव्य असल्याने या सौरदिव्यांचा फायदा परिसर प्रकाशमय होण्यास मदत होणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. पारगाव तर्फे आळे (ता. जुन्नर) येथे सौरदिवा बसविण्यात आला याप्रसंगी सुनंदा गाडगे, उपसरपंच रामदास तट्टू व ग्रामस्थ.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)