ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निर्मला पुरंदरे यांचे निधन

पुणे – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मलाताई पुरंदरे यांचे दीर्घ आजाराने शनिवारी रात्री ८.३० वा निधन झाले. त्या ८६ वर्षांच्या होत्या. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

निर्मला पुरंदरे यांनी वनस्थळी या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांच्या सबलीकरणासाठी काम केलं. १९८१ ला त्यांनी वनस्थळी या संस्थेची स्थापना करुन महिलांचं आरोग्य, त्यांचं शिक्षण आणि रोजगारासाठीच प्रशिक्षण यासाठी काम सुरू केलं. सामाजिक काम करताना त्यांनी विविध विषयांवर लेखन देखील केलं. स्नेहयात्रा हे त्यांच प्रवासवर्णन प्रसिद्ध आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी असुनही त्यांनी आयुष्यभर स्वतच वेगळं व्यक्तिमत्व आणि लेखन शैली जोपासली.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)