सोशल मिडिया धोकादायक आहे – सेलेना गोमेझ

सोशल मिडियाद्वारे आपल्या चाहत्यांसोबत सतत कनेक्‍ट असनारी सेलेना गोमेझ आता सोशल मिडियाला कंटाळली असुन तिला आता सोशल मिडिया धोकादायक वाटायला लागली आहे.

लॉस एन्जेलेस येथे झालेल्या एका कार्यक्रमानंतर बोलताना सेलेनाने सांगितले की, मी नेहमी ट्विटर. इन्स्टाग्राम द्वारे माझ्या चाहत्यांच्या संपर्कात असते त्यामुळे मला चाहत्यांच्या जास्त जवळ राहाता येते आणि त्यांची माझ्या कामा बद्दलची प्रतिक्रिया देखील मला कळते. मात्र, आता मी जरा जास्तच सोशल मेडियाच्या आहारी जाऊ लागले आहे. त्यामुळे मला एक प्रकारची उदासी आल्या सारखे वाटायला लागले आहे. कारण माझा जास्तीत जास्त वेळ सोशल मेडियावर जातो आहे. त्यातल्या त्यात आपल्या एखाद्या फोटो वरील किंवा ट्‌विट वरील चाहत्यांच्या चांगल्या वाईट कमेन्ट्‌स आपला कामाचा मूड खराब अथवा चांगला करण्यास कारणीभूत ठरत आहे.

चांगल्या कमेन्ट्‌स आल्या तर काही नाही मात्र जर वाईट कमेन्ट्‌स आल्या तर माझा जास्तीत जास्त वेळ त्या कमेन्ट्‌सचा विचार करण्यातच जात आहे. त्याचा परिणाम माझ्या कामावर होतो आहे. त्यामुळे आता मी नजीकच्या काळात सोशल मेडियाचा वापर कमी करण्यात प्रयत्नशील असेल असेही तीने यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)