बुलंदशहर दंगलीमागे सामाजिक धृवीकरणाचा डाव : शिवसेनेचा भाजपवर आरोप

मुंबई: उत्तरप्रदेशात बुलंदशहर जिल्ह्यात झालेल्या दंगलीवरून शिवसेनेने भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे. सन 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी मतांचे धर्माच्या आधारावर धृवीकरण करण्याचा डाव या दंगलीमागे असावा असा संशय शिवसेनेने व्यक्त केला आहे.

गायीचे मांस खाणे ही प्रथा गेली अनेक वर्षे गोवा, मिझोराम, नागालॅंड, अरूणाचलप्रदेश आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये सुरू आहे. पण त्या राज्यात कधी गोमासांवरून हिंसाचार किंवा जमावाने ठेचून मारण्याचे प्रकार घडत नाहीत. कारण त्या ठिकाणी लोकसभेच्या जागा अत्यंत कमी आहेत असे निरीक्षणही शिवसेनेने नोंदवले आहे. सन 2014 च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने उत्तरप्रदेशातील 80 पैकी 71 जागा जिंकल्या आहेत. हाच परफॉर्मन्स तेथे पुन्हा दाखवणे शक्‍य नाहीं याची जाणिव भाजपच्या नेत्यांना झाली आहे.

-Ads-

त्यातच विरोधी पक्ष भाजपच्या विरोधात तेथे एकत्र येत आहेत. त्यामुळेच त्यांना त्या राज्यात धार्मिक आधारावर मतदारांचे धृवीकरण करणे अगत्याचे वाटत असावे असाही शिवसेनेचा निष्कर्ष आहे. सन 2014 च्या निवडणुकीपुर्वी उत्तरप्रदेशात मुज्जफरनगर जिल्ह्यात दंगली झाल्या होत्या. बुलंदशहर मध्ये झालेल्या दंगली ही त्याचीच पुनरावृत्ती आहे असेही शिवसेनेचे म्हणणे आहे. उत्तरप्रदेशातील 80 जागा या भाजपसाठी अत्यंत महत्वाच्या आहेत त्यामुळेच हा सारा खटाटोप चालला असावा असेही त्यांचे म्हणणे आहे. सन 2015 मध्ये दादरी येथे झालेल्या हत्या प्रकरणाची भाजपने ठाम भूमिका घेऊन चौकशी केली आहे काय? किंवा त्यातील आरोपींना अटक करण्यात आली आहे काय? असा सवालही शिवसेनेने उपस्थित केला आहे.

What is your reaction?
13 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)