… तर पाइपलाइनाचा खर्च कशासाठी?

कात्रज – कात्रज ते धनकवडी या भागांमध्ये स्वारगेट सातारा रोडवरील उभारण्यात आलेल्या बीआरटी मार्ग आणि शंकर शेठ महाराज उड्डाण पूलाखालील लावण्यात आलेल्या झाडांना महानगरपालिकेतर्फे उन्हाळ्यामध्ये टॅंकरद्वारे पाणी देण्यात येत आहे. मात्र, शंकर शेठ महाराज उड्डाण पूल खालील जी झाडे रस्त्याच्या बाजूंनी लावलेली आहेत. त्यांच्याकरिता पाण्यासाठी पाइपलाइन करून देखील पाइपलाइन आतापर्यंत सुरू झालेली नाही.

टॅंकरद्वारे पाणीपुरवठा झाडांना करायचाच होता तर पाइपलाइनसाठी खर्च करून महानगरपालिकेचे पैसे उगाचच वाया घालविले, असे नागरिक चर्चा करत आहेत. एकीकडे पुण्यामध्ये पाण्याची समस्या लोकांसाठी रोज भेडसावत आहे. त्यातच टॅंकरद्वारे चालू स्थितीत पाणी झाडांना दिले जाते. या उड्डाणपुलाखाली काही ठिकाणी पाहिले तर, काही ठिकाणी झाडे जळून गेली आहेत. फक्त माती आहे, जर नगरपालिकेतर्फे दर आठवड्याला या झाडांना पाणी पुरवठा केला जातो. त्यावेळेसच या मोकळ्या जागेत झाडे आतापर्यंत का लावली गेली नाहीत, हा प्रश्‍न नागरिकांनी विचारला आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)