…त्यामुळे ज्येष्ठ जगतात भिकऱ्यांचे आयुष्य- डॉ. अभिजीत सोनवणे

सोमेश्‍वरनग येथे डॉ. अभिजीत सोनवणे यांचे प्रतिपादन 

सोमेश्‍वरनगर: कुटुंबातील सदस्य उतार वयात आपल्याच घरातील ज्येष्ठ व्यक्तीकडे दुर्लक्ष करतात. त्याची जबाबदारी घेण्याचे टाळतात त्यामुळे ज्येष्ठांना भिकऱ्यांचे आयुष्य जगावे लागते, असे प्रतिपादन भिकाऱ्यांचे डॉक्‍टर म्हणून प्रसिद्ध असलेल्या डॉ. अभिजीत सोनावणे यांनी केले.

-Ads-

सोमेश्वरनगर येथे ज्ञान विज्ञान गप्पा या कार्यक्रमात डॉ. सोनवणे बोलत होते. याप्रसंगी प्राचार्य सोमप्रसाद केंजळे, रामेश्‍वरी जाधव, राजकुमार बनसोडे, कुंडलिक कदम, रेश्‍मा पठाण, ज्ञानेश्‍वर जगताप, गणेश सावंत, अझर नदाफ उपस्थित होते.

डॉ. सोनवणे म्हणाले की, आपला समाज दरात माणूस भिक मागायला आला की त्याला भीक देतो त्यामुळे त्यांना भीक मागून जगायची सवय लागते. म्हणून समाजाने त्यांना भीक नाकारली पाहिजे. भीक मागणे हा कलंक असून समाजाने त्यांना काम करायला प्रवृत्त केल्यास आणि उतारवयात कुटुंबाने त्यांना आधार दिल्यास भिकारी ही समस्या उरणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भिकारी असले तरी त्यांच्यात माणुसकी असते आणि मायेचा ओलावा ही असतो.

त्यापुढे रक्ताची नाती शुल्लक ठरतात असे नमूद करताना त्यांनी भिकर्यातील माणूसपणाची अनेक उदाहरणे दिली. भिकाऱ्यांना रोजगारासाठी प्रवृत्त करण्यासाठी ते आपल्या सोसायटी फॉर हेल्थ अँड मेडीसिन, पुणे या संस्थेच्या माध्यमातून कार्यरत असून अनेक भिकाऱ्यांना त्याद्वारे रोजगार निर्मिती बरोबरच त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी संस्थेमार्फत ते कार्यरत असून त्याला अनेक लोकांची, आणि कुटुंबातील सदस्यांची साथ आणि सक्रिय सहभाग आहे असेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल खरात यांनी तर आभारप्रदर्शन आकाश सावळकर यांनी केले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)