म्हणून ‘सत्यमेव जयते’ 15 ऑगस्टला प्रदर्शित-जॉन अब्राहम

अभिनेता जॉन अब्राहमचा ‘सत्यमेव जयते’ येत्या 15 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी अक्षयकुमारचा ‘गोल्ड’ देखील येत आहे. त्यामुळे या दोन्ही चित्रपटांमध्ये टक्कर पाहायला मिळणार आहे.

जॉन, मनोज वाजपेयी आणि आयशा शर्मा यांनी पत्रकारांशी सवांद साधला. दरम्यान, जॉन अब्राहमने चित्रपट प्रदर्शनाची तारीख 15 ऑगस्ट का ठेवली ?, हे स्पष्ट केले आहे. तो म्हणाला, व्यवसायिक दृष्टिकोनातून विचार करून ही तारीख ठरवली आहे.

‘परमाणु’ नंतर जॉन अब्राहम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून मिलाप झवेरीने ‘सत्यमेव जयते’ दिग्दर्शित केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)