बर्फवृष्टीमुळे ‘श्रीनगर-लेह’ राष्ट्रीय महामार्ग बंद 

file photo

श्रीनगर – मागील 24 तासापासून सुरू असलेल्या हिमवृष्टीमुळे लद्दाख क्षेत्राचा संपर्क काश्मीर घाटीशी तुटला आहे. गेल्या तीन दिवसापासून सातत्याने या क्षेत्रात जोरदार बर्फवृष्टी होत आहे.

प्रशासनाच्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री जोरदार बर्फवृष्टी झाली. त्यामुळे शनिवारी येथील क्षेत्रातील रहदारी थाबंविण्यात आली आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात बर्फ जमा झाल्याने वाहने घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे सीमा रस्ता संघटना (Border Roads Organisation) आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांचे कर्मचारी मशीनव्दारे रस्त्यावरील बर्फ हटविण्याचे काम करत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वाहतूक विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, बर्फवृष्टीमुळे रस्त्यावर घसरण निर्माण झाली आहे. हवामानात सुधारणा झाली की, वाहतूक पुन्हा सुरू केली जाईन. रस्ते मोकळे झाल्यानंतर महामार्गावर द्रासपासून काश्मीर आणि श्रीनगरपासून लेहपर्यंत वाहतुकीची परवानगी दिली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)