स्नूकर अजिंक्‍यपद स्पर्धा- पीवायसी वॉरियर्स संघाचा बाद फेरीत प्रवेश

पुणे  -पीवायसी हिंदू जिमखाना क्‍लब आयोजित तेराव्या पीवायसी-एटीसी स्नूकर अजिंक्‍यपद 2019 स्पर्धेत गटसाखळी फेरीत पीवायसी वॉरियर्स संघाने आपली विजयी मालिका कायम ठेवत बाद फेरीत प्रवेश केला.

पीवायसी हिंदू जिमखाना व डेक्कन जिमखाना येथील बिलियर्डस हॉलमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत गटसाखळी फेरीत पहिल्या सामन्यात पीवायसी वॉरियर्स संघाने अ गटात अव्वल स्थानी असणाऱ्या खार जिमखाना संघाचा 2-1 असा पराभव केला. सामन्यात पीवायसीच्या राजवर्धन जोशीने खार जिमखानाच्या स्पर्श फेरवानीचा 29-42, 80-33, 07-36, 63-17, 43-18 असा पराभव करून आघाडी घेतली. त्यानंतर पीवायसीच्या आदित्य देशपांडेला खार जिमखानाच्या रिषभ ठक्करकडून 43-22, 27-71, 23-48, 27-83 असा पराभव पत्करावा लागला.

तिसऱ्या लढतीत खार जिमखानाचा ईशप्रित चड्डा उपस्थित राहू न शकल्यामुळे पीवायसीच्या योगेश लोहियाला पूढे चाल देण्यात आली. दुसऱ्या सामन्यात पीवायसी वॅरियर्स संघाने फायर बॉल संघाचा 3-0 असा सहज पराभव करून सलग तिसरा विजय मिळवला. याच गटात पहिल्या सामन्यात फायर बॉल्स संघाने क्‍यू मास्टर्स ब संघाचा 3-0, तर दुसऱ्या सामन्यात फायर बॉल्स संघाने क्‍यू क्‍लब किलर्सचा 2-1 असा पराभव करून सलग दुसरा विजय मिळवला. फ गटात समर खंडेलवाल, जयदीप खांडेकर, सुशील ढोंसळे यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर डेक्कन प्रोफेशनल्स संघाने प्राधिकरण युथ फोरमचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला.

एकतर्फी झालेल्या लढतीत इ गटात कॉर्नर पॉकेट शूटर्स संघाने ऑटो पॉट्‌स संघावर 3-0 अशा फरकाने सनसनाटी विजय मिळवला. यामध्ये कॉर्नर पॉकेट शूटर्सच्या शोऐब खान याने ऑटो पॉट्‌सच्या रुषभ जैनचा 62-15, 19-74, 41-01, 76-30 असा पराभव करून संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात संदिप गुलाटी याने सुरेख खेळाचे प्रदर्शन करत आपल्या खेळीत दुसऱ्या फ्रेममध्ये 90 गुणांचा ब्रेक नोंदवून पारस शाहचा 42-15, 114 (90)-01, 44-11 असा पराभव केला. तिसऱ्या लढतीत कॉर्नर पॉकेट शूटर्सच्या शिवम अरोराने लव बोरीचा याचा 22-18, 80(61)- 15, 44-09 असा पराभव करून संघाला 3-0 असा विजय मिळवून दिला. शिवम अरोराने आपल्या खेळीत दुसऱ्या फ्रेममध्ये 61 गुणांचा ब्रेक नोंदविला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)