पांडे डिझाईन्स, केएसबीए, एमपी स्ट्रायकर्स उपांत्यपूर्व फेरीत

पुणे -पीवायसी हिंदू जिमखाना क्‍लब आयोजित तेराव्या पीवायसी-एटीसी स्नूकर अजिंक्‍यपद 2019 स्पर्धेत पांडे डिझाईन्स, केएसबीए, एमपी स्ट्रायकर्स, पंडित जावडेकर असोसिएट्‌स, कॉर्नर पॉकेट चॅलेंजर्स, कॉर्नर पॉकेट वॉरियर्स, क्‍यू क्‍लब वॉरियर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

पीवायसी हिंदू जिमखाना येथील बिलियर्डस्‌ हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत उप-उपांत्यपूर्व फेरीत राष्ट्रीय स्नूकर खेळाडू ब्रिजेश दमानी, अनुज उप्पल यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर पांडे डिझाईन्स संघाने बीएसएए मास्टर्स संघाचा 2-0 असा एकतर्फी पराभव केला. पंडित जावडेकर असोसिएट्‌स संघाने एलसीएसए संघाचे आव्हान 2-0 असे संपुष्टात आणले.
चुरशीच्या झालेल्या सामन्यात मध्य प्रदेशच्या एमपी स्ट्रायकर्स संघाने पीवायसी वॉरियर्सचा 2-1 असा संघर्षपूर्ण पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.

सामन्यात एमपी स्ट्रायकर्सच्या अनुराग गिरीने पीवायसी वॉरियर्सच्या योगेश लोहियाचा 68(68)-00, 53-61, 49-10, 115(115)-04 असा पराभव करून संघाला 1-0अशी आघाडी मिळवून दिली. पण दुसऱ्या सामन्यात एमपी स्ट्रायकर्सच्या केतन चावलाला पीवायसी वॉरियर्सच्या आदित्य देशपांडेने 13-44, 14-55, 15-33 असे पराभूत करून संघाला बरोबरी साधून दिली. तिसऱ्या व निर्णायक लढतीत एमपी स्ट्रायकर्सच्या भरत सिसोडिया याने कडवी झुंज देत राजवर्धन जोशीचा 10-53, 58-50, 25-41, 75-19, 49-16असा पराभव करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

खार जिमखाना संघाने आपली विजयी मालिका कायम ठेवत कॉर्नर पॉकेट क्‍युईस्टचा 2-0 असा पराभव करून आगेकूच केली. कर्नाटकाच्या केएसबीए संघाने अमनोरा द फर्न क्‍लब संघाचा 2-0 असा पराभव करून स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले. विजयी संघाकडून एम. एस. अरुण, योगेश कुमार यांनी सुरेख कामगिरी केली. क्‍यू क्‍लब वॉरियर्स संघाने वाडेश्‍वर विझार्डसवर 2-1 असा विजय मिळवला. संदीप गुलाटी, शिवम अरोरा, शोएब खान यांनी केलेल्या अफलातून कामगिरीच्या जोरावर कॉर्नर पॉकेट वॉरियर्स संघाने द बॉल हॉग्जचा 3-0 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)