स्नुकर अजिंक्‍यपद स्पर्धा : जावडेकर असोसिएट्‌स संघाची आगेकूच

तेरावी पीवायसी-एटीसी स्नुकर अजिंक्‍यपद स्पर्धा

पुणे – गटसाखळी फेरीत मोहम्मद हुस्सेन खान, सिद्धार्थ पारीख आणि कमल चावला यांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर पंडित जावडेकर असोसिएट्‌स संघाने वायएमएसए यंगस्टर्सचा 3-0 असा सहज पराभव करून येथे होत असलेल्या पीवायसी हिंदू जिमखाना क्‍लब आयोजित तेराव्या पीवायसी-एटीसी स्नुकर अजिंक्‍यपद 2019 स्पर्धेत विजयी सलामी दिली.

पीवायसी हिंदू जिमखाना व डेक्कन जिमखाना येथील बिलियर्ड्‌स हॉलमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत गटसाखळी फेरीत ड गटात पंडित जावडेकर असोसिएट्‌स संघाने वायएमएसए यंगस्टर्सचा 3-0 असा पराभव केला. सामन्यात पंडित जावडेकर असोसिएट्‌सच्या मोहम्मद हुस्सेन खान याने अनमोल पंडिताचा 40-00, 95-06, 48-27 असा, तर पंडित जावडेकर असोसिएट्‌सच्या सिद्धार्थ पारीख याने क्रिश गुरबयानीचा 31-36, 65-66, 40-14,103(47,36)-00 असा पराभव केला. सिद्धार्थ पारीखने आपल्या खेळीत चौथ्या फ्रेममध्ये 47 व 36 गुणांचा ब्रेक नोंदविला. तिसऱ्या लढतीत कमल चावला याने जीत भोजनीचा 44-00, 35-61, 38-22, 74-08 असा पराभव केला.

ब गटात लक्ष्मण रावत, लकी वटनानी व फैजल खान यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर कॉर्नर पॉकेट चॅलेंजर्स संघाने पीवायसी जायंट्‌सचा 3-0 असा पराभव करून आगेकूच केली. सामन्यात फैजल खान याने आपल्या खेळीत दुसऱ्या व चौथ्या फ्रेममध्ये अनुक्रमे 61 व 50 गुणांचा ब्रेक नोंदविला. क गटात कॉर्नर पॉकेट क्‍युईस्ट संघाने पॉट ब्लॅक संघावर 3-0 असा सनसनाटी विजय मिळवला.

अन्य लढतीत क गटात एलसीएसए संघाने क्‍यू क्‍लब एसेस संघाला 3-0 असे नमविले. विजयी संघाकडून शोएब चंद्रा, आयुश मित्तल, अक्षय कुमार यांनी अफलातून कामगिरी बजावली. ग गटात बीएसएए मास्टर्स संघाने 147 पूल अँड स्नूकर संघाचा 2-1 असा संघर्षपूर्ण पराभव केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)