तेरावी पीवायसी-एटीसी स्नूकर अजिंक्‍यपद स्पर्धा : द बॉल हॉग्ज, केएसबीएची आगेकूच

पुणे -द बॉल हॉग्ज, क्‍यू क्‍लब वॉरियर्स, एलसीएसए, एमपी स्ट्रायकर्स, केएसबीए, कॉर्नर पॉकेट शूटर्स, बीएसएए मास्टर्स, खार जिमखाना या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून येथे सुरू असलेल्या तेराव्या पीवायसी-एटीसी स्नूकर अजिंक्‍यपद 2019 स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

या स्पर्धेत बाद फेरीत शाहबाज खान, आशिक मुदसेर यांच्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर क्‍यू क्‍लब वॉरियर्स संघाने फायर बॉल्सचा 2-0 असा पराभव करून आगेकूच केली. दुसऱ्या सामन्यात द बॉल हॉग्ज संघाने पूना क्‍लब अ संघाचा 2-1 असा संघर्षपूर्ण पराभव केला. दुसऱ्या सामन्यात द बॉल हॉग्जच्या आदित्य अगरवाल याने दिनेश मेहतानीचा पराभव करून संघाला बरोबरी साधून दिली. तिसऱ्या व निर्णायक लढतीत द बॉल हॉग्जच्या रोहन साकळकरने पूना क्‍लबच्या सुरज राठीचा पराभव करून संघाला विजय मिळवून दिला. अन्य लढतीत अक्षय कुमार, आयुश मित्तल यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर एलसीएसए संघाने ऑटो पॉट्‌स संघाचे आव्हान 2-0 असे संपुष्टात आणले.

कॉर्नर पॉकेट शूटर्स संघाने क्‍यू मास्टर्स अ संघाचा 2-0 असा पराभव करून स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले. चुरशीच्या झालेल्या लढतीत खार जिमखाना संघाने एसआरके मास्टर्सचा 2-1 असा पराभव केला. सामन्यात खार जिमखानाच्या ईशप्रित चड्डाला कडवी झुंज देत एसआरकेच्या वाहीद खानने विजय मिळवत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुसऱ्या लढतीत खार जिमखानाच्या स्पर्श फेरवानीने एसआरकेच्या कृष्णराज अरकोटचतीन फ्रेममध्ये सहज पराभव करून संघाचे आपल्या सामन्यातील आव्हान
कायम राखले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)