नवी दिल्ली – कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा अमेठीत पराभव करणाऱ्या महिला आणि बालविकासमंत्री स्मृती इराणी आता अमेठीत घर बांधणार आहेत. अमेठीतील गौरीगंज येथे त्यांनी घरासाठी जागाही निश्चित केली आहे. माझे कायमस्वरूपी घर आता अमेठीत असेल आणि त्याची दारे लोकांसाठी सदैव उघडी असतील, असे इराणी म्हणाल्या.
दरम्यान, अमेठीतील प्रतिष्ठेच्या लढतीत राहुल गांधी यांचा त्यांनी 55 हजार मतांनी पराभव केला. हा गांधी परिवाराचा प्रभाव असलेला मतदार संघ आहे. अमेठीत गेल्या लोकसभेदरम्यान सुध्दा स्मृती इराणी यांनी राहुल गांधींशी लढत दिली होती पण त्यावेळी त्यांचा मोठा पराभव झाला होता. पण त्यानंतरही त्यांनी सातत्याने अमेठीतील लोकांशी संपर्क ठेवला त्याचा त्यांना लोकसभा2019 निवडणुकीत लाभ झाला.