स्मृती इराणी यांच्याकडून खासदार निधीचा अपहार

कॉंग्रेसचा आरोप: मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी

नवी दिल्ली – कॉंग्रेसने गुरूवारी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या स्मृती इराणी यांच्याविरोधात मोहीम हाती घेत त्यांच्यावर खासदार निधीचा अपहार केल्याचा आरोप केला. त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणीही कॉंग्रेसने केली.

रणदीप सुर्जेवाला आणि शक्तिसिंह गोहील या कॉंग्रेस नेत्यांनी पत्रकार परिषदेत स्मृती यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केला. स्मृती यांनी निविदेशिवाय 5 कोटी 93 लाख रूपयांचे पेमेंट केल्याचा कॅगचा अहवाल असल्याचा दावा त्यांनी केला. स्मृती यांनी सरकारी निधीचा गैरवापर केला आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत चौकशी होण्यासाठी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना मंत्रिमंडळातून हटवण्याचे धाडस दाखवावे, असे आव्हान कॉंग्रेस नेत्यांनी दिले. स्मृती यांच्या गैरव्यवहाराकडे गुजरातच्या आणंद जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पत्राद्वारे लक्ष वेधल्याचा दावाही त्यांनी केला. स्मृती यांनी बुधवारीच कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि त्या पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यावर जमीन व्यवहारात भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला. त्यापाठोपाठ कॉंग्रेसने स्मृती यांच्यावर निशाणा साधला आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)