‘सिंहासन खाली करो राहुल जी कि जनता आती हे’…भाग राहुल भाग – स्मृती इराणी

नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाच्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत ‘सिंहासन खाली करो राहुल जी कि जनता आती हे’ असे म्हंटले आहे. स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांना लक्ष करत सोशल माध्यम ट्विटर वर #BhaagRahulBhaag या हॅशटॅग सह ट्विट केले आहे.

कांग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे अमेठीसह केरळ मधील वायनाड मधून निवडणूक लढविण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याचा आधार घेत भारतीय जनता पक्षाच्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करत, जनतेने राहुल यांना नाकारल्यामुळे ते सुरक्षित मतदारसंघ शोधत असल्याचे म्हंटले आहे. विविध मतदार संघातून राहुल गांधी यांना निवडणूक लढविण्यास कार्यकर्ते मागणी करत असल्याचा खोटा दिखावा काँग्रेस पक्ष करत असल्याचे सांगून स्मृती इराणी यांनी अमेठी येथील लढत जोरदार होणार असल्याचे सूचित केले आहे.

उत्तर प्रदेशातील अमेठी हा मतदारसंघ काँग्रेसचा गड असून अमेठीच्या मतदारांनी नेहमीच काँग्रेसच्या बाजूने कौल दिला आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जेव्हा संपूर्ण देश मोदी लाटेवर स्वार होता तेव्हा देखील अमेठीच्या जनतेने राहुल गांधी यांच्या बाजूने कौल दिला होता. २०१४मध्ये काँग्रेसतर्फे राहुल गांधी तर भाजपतर्फे स्मृती इराणी या मतदारसंघातून एकमेकांसमोर उभे ठाकले होते. अमेठीच्या जनतेने त्या वेळी राहुल गांधींच्या पारड्यात सर्वाधिक ४ लाख मतं टाकली होती. त्यापाठोपाठ स्मृती इराणी यांना ३ लाख तर बसपाच्या धर्मेंद्र प्रताप सिंग यांना ६० हजार मतं मिळाली होती. काँग्रेसचा गड समजल्या जाणाऱ्या मतदारसंघातून स्मृती इराणी यांना ३ लाखांहून अधिक मतं मिळणं हे काँग्रेससाठी तस धक्कादायकच मानलं जात होत कारण यापूर्वी २००९च्या निवडणुकांमध्ये भाजपच्या उमेदवारास केवळ ३७ हजार मतं मिळाली होती. त्यामुळे लोकसभा निवडणुकांमध्ये नेहमीच प्रतिष्ठेचा मानल्या जाणाऱ्या अमेठी मतदारसंघाची मदार यावेळी देखील भाजपतर्फे स्मृती इराणी यांच्याकडेच सोपविण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)