स्मार्ट सोल्यूशन्स

प्रत्येक मुलीला सुंदर दिसायला आवडतं. ग्लॅमरस दिसायचं असेल तर काही चुका मेकअप करताना टाळायला लागतात. सुंदर दिसण्यासाठी मुली काय काय उपाय करू शकतात. सुंदर दिसण्यासाठी त्या वेगवेगळ्या मेकअफ प्रोडक्‍ट्‌सचा वापर करतात, तसेच वेगवेगळे मेकअप करण्याचे व्हीडिओही त्या नेहमी पाहात असतात तरी पण नकळतच नेहमी मेकअप करताना त्यांच्या चुका होतातच. त्यामुळे पूर्ण लूक खराब होऊन जातो. या चुका कशा सुधारायच्या किंवा या चुका होऊ नये यासाठी काही उपाय तुमच्यासाठी.

सुंदर दिसायला कोणाला नाही आवडत? सगळ्याच स्त्रिया सुंदर दिसण्यासाठी मेकअपचा वापर करत असतात. मेकअप करताना काही चुका स्त्रियांकडून होत असतात. या छोट्या छोट्या चुकांमुळे आपल्या पूर्ण चेहऱ्याचा लूक खराब होऊ शकतो. या चुका सगळ्याच स्त्रियांच्या बाबतीत होतच असतात. अशा या चुकांवर स्मार्ट सोल्यूशन असतात ते स्मार्ट सोल्यूशन तुमच्यासाठी. यावरून घाबरून जायची गरज नाही तर यावर उपाय म्हणून काही टिप्स आणि घरगुती उपाय आहेत, ज्यावरून तुम्ही आकर्षक लुक मिळवू शकतात. अशा काही टिप्स तुमच्यासाठी.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आपण चहा किंवा कॉफी पिताना आपल्या दातांवर आणि चहाच्या कपवर आपल्या लिपस्टिकचे निशाण उमटले तर काही वेळेस लिपस्टिकच्या शेडस्‌ खूप डार्क असतात, त्याचप्रमाणे त्या घट्ट स्वरूपात असतात म्हणून अशा लिपस्टिकचा वापर आपल्या ओठांवर केला तर काही वेळेस त्या बाहेर येतात. असं होत असेल तर त्याचा फक्‍त एकच कोट ओठांवर लावावा. नाहीतर लिप प्राईमरचा वापर करावा आणि मग लिपस्टिक लावावी. असे केल्यास लिपस्टीक जास्त वेळ राहते.

उन्हाळ्यात गरम होत असल्यामुळे चेहऱ्यावरील फाऊंडेशनचे डाग दिसून येतात. तुमच्या स्कीन टोनला मॅच होणार फाऊंडेशन वापरावं. तसेच वय वाढत जातं. त्यामुळे त्वचा पातळ होत जाते. तुम्ही जास्त प्रमाणात फाऊंडेशनचा वापर केला तर चेहऱ्यावर भार असल्याचं जाणवतं त्यामुळे असं झाल्यास तुमची स्कीन लूज पडायला लागते. उन्हाळ्यात नेहमी लाईट फाऊंडेशन आणि मुसचा वापर करावा आणि नेहमी लक्षात ठेवा फाऊंडेशनचा वापर करतात तेव्हा ते बरोबर स्कीनमध्ये ब्लेंड व्हायला पाहिजे. तरच बेस नीट दिसेल आणि फाऊंडेशनचे डाग दिसणार नाही.

घरगुती फेशियल किंवा ब्यूटी मास्कचा वापर केल्यावर चेहऱ्यावर रॅशेस्‌ उठतात का?
घरगुती ब्युटी मास्क किंवा फेशियल, ब्युटीपार्लरमधून केलेला ब्युटी मास्क किंवा फेशियल असो दोघांमुळे रॅशेज्‌ येण्याची दाट शक्‍यता असते. त्यामुळे चांगल्या ब्युटी प्रोडक्‍टचा वापर करावा. तुमच्या चेहऱ्यावर रॅशेस आले असतील तर साफ मलमलचं कापड घेऊन ते दुधात भिजवून ठेवावं आणि रॅशेस आलेल्या जागेवर लावावं, यामुळे इरिटेशन तसेच आग कमी होते.

जाड्या स्वरूपातील आयलाईनर सगळ्याच चेहऱ्यावर सूट होतं का? किंवा कॅमेरा फेस करण्यासाठी इतक्‍या जाड्या लाईनरचा वापर करावा लागतो का?
नेहमीच असं नाही होत. छान आणि नॅचरल लुकसाठी नेहमी वॉटर बेस लाईनरचा वापर करावा. डोळे मोठे असतील तर थोड्या जाड्या किंवा बोल्ड लाईनरचा वापर करावा आणि ज्यांचे डोळे छोटे असतील तर त्यांनी कमी स्वरूपात म्हणजेच अगदी बारीक लाईनर लावावे.

कन्सीलर त्वचेवर जास्त वेळ टिकवण्यासाठी किंवा ते स्कीनमध्ये चांगल्या प्रकारे ब्लेंड करता येण्यासाठी उपाय.
तुम्हाला कन्सीलर चेहऱ्यावर लावायचा असेल तर पहिला चेहऱ्याचा मसाज करावा तरच कन्सीलरचा परिणाम चांगला येईल. कन्सीलर जिथे पाहिजे आहे तिथेच लावावे आणि कन्सीलरच्या स्पंजने ते ब्लेंड करावे. असं केल्यास तुमचा चेहऱ्याला एक आकर्षक लूक येईल. योग्य प्रकारे कन्सीलर ब्लेंड केल्यास तुम्हाला त्याचा रिझल्ट चांगला मिळेल.

मस्कऱ्याचा वापर कसा करावा?
मस्कारा वॉटरप्रूफ आहे तर मेकअप रिमूव्हरने किंवा कॉटन बडने सहजपणे काढता येतो. अगदी नाजूक हातांनी मस्कारा पुसावा लागतो. मस्कारा लावल्यानंतर तो वाळला आहे की नाही ते आधी बघा आणि मग त्यावर मेकअप बेस लावा, असे केल्यास तो लवकर सेट होतो. डोळ्यांची फ्रेमिंग करायला विसरू नये.

जास्त ब्लशचा वापर केल्यास…
वय जसं जसं वाढत जातं तसं तसं आपली त्वचा ही नाजूक बनत जाते आणि ती लूज बनत जाते. ब्राऊन कलरचं ब्रोंझर हा जास्त हायलाइट होतो. तरुण मुलींच्या चेह-यावर पिंक वा पिच कलरचा ब्लश जास्त चांगला दिसतो. दिवसा नेहमी पावडर स्वरूपातील ब्लशचा वापर करावा. ब्लश लावल्यानंतर चेहरा तेव्हाच आकर्षक दिसू शकतो जेव्हा आपण मेकअप बेस चांगल्या पद्धतीने लावला असेल.

जास्त प्रमाणात आयशॅडोज्‌ वापर करणे योग्य आहे का?
नेहमी लक्षात ठेवा की डोळे छोटे असतील तर त्या डोळ्यांवर लाईट कलरच्या आयशॅडोज्चा वापर करावा आणि डोळे मोठे असतील तर त्यावर फक्त आय लाईनरचा वापर करावा. आयशॅडोज्‌ लावण्याचा ब्रश आणि आयशॅडोज ब्लेंड करण्याचा ब्रश हा नेहमी वेगळा असला पाहिजे.

चेहऱ्यासोबत मानेला आणि हातांनाही मेकअप करावा का?
नेहमी आपण चेहऱ्याचा मेकअप करतो पण जर चेहऱ्यासोबत मानेला किंवा हातांनाही मेकअप करायचा असेल तर ब्रोंजर हे नाक, गाल, कपाळावर आणि जॉ लाईनला लावून खाली मानेवर आणि हातांना लावून व्यवस्थित ब्लेंड करावं. आपल्या स्कीन टोनला मॅच होईल असा ब्रोंझरचा वापर करावा किंवा एक, दोन शेड वरती म्हणजेच काय थोडा डार्क असेल तरही चांगलं.

– कविता चंदनशिवे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)