स्मार्टफोन खरेदीत भारत जगात दूसरा

मुंबई – स्मार्टफोन विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत भारतात दाखल झालेल्या स्मार्टफोन्सची संख्या 4.04 कोटी इतकी होती. तर 10.06 कोटींच्या स्मार्टफोनसह चीन पहिल्या स्थानावर आहे. याच कालावधीत अमेरिकी बाजारपेठेत दाखल झालेल्या स्मार्टफोन्सची संख्या 4 कोटी होती. त्यामुळे या कालावधीत झालेल्या स्मार्टफोन्सच्या विक्रीच्या बाबतीत भारताने अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. मात्र, स्मार्टफोन्सच्या खरेदीच्या बाबतीत चिनी बाजारपेठ भारतापेक्षा प्रचंड पुढे असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत जागतिक बाजारपेठांमध्ये मंदी आहे व जागतिक बाजारात स्मार्टफोन्सची एकूण उलाढाल घटली आहे. जुलै ते सप्टेंबर 2018 या तिमाहीमध्ये गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत स्मार्टफोन्सची विक्री 7.2 टक्‍क्‍यांनी घटून 34.89 कोटी इतकी झाली आहे. गेले चार महिने स्मार्टफोन्सच्या विक्रीत घट होत आहे.

जगातल्या दहापैकी सात देशांमधील बाजारपेठांमध्ये स्मार्टफोन्सच्या विक्रीत घट झाली आहे व 2015 नंतरची आत्तापर्यंतची ही सर्वात सुमार कामगिरी आहे. स्मार्टफोन बदलण्याचा कालावधी वाढल्यामुळे हे होत आहे. तसेच आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये असलेल्या समस्या व बड्या चिनी उत्पादकांचे आव्हान यामुळेही बाजारावर परिणाम झाला.

ज्या तीन देशांमध्ये स्मार्टफोनच्या विक्रीत वाढ झाली आहे त्यामध्ये इंडोनेशिया, रशिया व जर्मनी (2.4 टक्के वाढीसह 55 लाख) यांचा समावेश आहे. पहिल्या स्थानी असलेल्या चिनी बाजारपेठेतील मागणीही गेल्या वर्षीच्या तुलनेत या तिमाहीत 15.2 टक्‍क्‍यांनी घटली तर भारतातली मागणी 1.1 टक्‍क्‍याने घटली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)