स्मार्ट सिटीचे जाहिरात फलक होणार नियमित

प्रशासनाचा आयुक्तांसमोर प्रस्ताव : वादावर पडणार पडदा

पुणे – स्मार्ट सिटीकडून शहरात उभारण्यात आलेल्या व्हेरिएबल मेसेज डिस्प्ले (व्हीएमडी)चा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. महापालिकेच्या आकाशचिन्ह आणि परवाना विभागाकडून या बाबतचा प्रस्ताव महापालिका आयुक्तांच्या मान्यतेसाठी ठेवला आहे. त्यात या डिस्प्लेवर जाहिरात करता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या “व्हीएमडी’वरून सुरू असलेल्या वादावर अखेर पडदा पडणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शहरातील नागरिकांना एकाच वेळी संदेश तसेच माहिती देता यावी, यासाठी स्मार्ट सिटी कंपनीकडून स्मार्ट एलिमेंटस प्रकल्पांतर्गत सुमारे 150 हून अधिक “व्हीएमडी’ उभारण्यात आलेल्या आहेत. मात्र, या “व्हीएमडी’ पदपथ फोडून तसेच आकाशचिन्ह विभागाची मान्यता घेताच उभारण्यात आलेल्या आहेत. त्यमुळे महापालिकेच्या मुख्यसभेत नगरसेवकांनी याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या होत्या.

त्याची दखल घेत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्मार्ट सिटीला या प्रकरणी नोटीसही बजाविली होती. यावेळी स्मार्ट सिटीने हे फलक नागरिकांच्या माहीतीसाठी असल्याने त्यांना स्ट्रीट फर्निचरचा दर्जा देऊन त्यास मान्यता द्यावी अशी मागणी केली होती. त्यानंतर स्मार्ट सिटी प्रशासन आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक होऊन या बैठकीत या फलकांना काही अटींवर मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यानुसार, आकाशचिन्ह विभागाने याबाबतचा प्रस्ताव महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मान्यतेसाठी ठेवला आहे. त्यामुळे आयुक्तांची मान्यता मिळताच हे फलक अधिकृत होणार आहे.

दरम्यान, या फलकांवर कोणतीही व्यावसायिक जाहिरात करणार नाही तसेच या फलकांबाबत नागरिक अथवा वाहतुकीस अडथळा ठरत असल्याच्या तक्रारी आल्यास हे फलक काढून टाकावे लागतील, अशा अटी स्मार्ट सिटीला टाकल्याचे महापालिका प्रशासनाकडून म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)