जिल्ह्यातील तीन लाख मतदार बनले ‘स्मार्ट’

उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर : जिल्हा निवडणूक शाखेकडून “स्मार्ट एपिक कार्ड’चे वाटप

नगर – जिल्हा निवडणूक शाखेच्या धाडसी उपक्रमात जिल्ह्यातील दोन लाख 81 हजार 252 मतदारांना अत्याधुनिक नवीन निवडणूक ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. जिल्ह्यात एकूण 32 लाख 40 हजार मतदार आहे. उर्वरित मतदारांना टप्प्याटप्प्याने लवकरच “स्मार्ट एपिक कार्ड’चे वाटप जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली केले जाणार आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हानिवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांनी दिली.

निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार राबविण्यात 18 ते 21 या वयाच्या मतदार नावनोंदणी केलेल्या मतदारांना मागील स्वातंत्र्य दिनापासून आधुनिक निवडणूक मतदार ओळखपत्र (स्मार्ट एपिक कार्ड) देण्यात येत आहे. सुरूवातीला 14 हजार कार्डचे वाटप करण्यात आले होते. निवडणूक विभागाने नवमतदारांची नावनोंदणीचे काम अतिशय प्रभावीपणे राबवून, नवमतदारांना जिल्हा निवडणूक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार स्वातंत्र्य दिनापासून आधुनिक निवडणूक मतदार ओळखपत्र वाटपही सुरू करण्यात आले असून, आतापर्यंत तीन लाख मतदारांना “स्मार्ट एपिक कार्ड’चे वाटप करण्यात आले आहे. मतदारांना हे केंद्र सरकारचे मिळणारे कार्ड कायमस्वरूपी ओळखपत्र म्हणून वापर करता येणार आहे, त्यामुळे मतदारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. निवडणूक विभागाचे कार्य अतिशय कौतुकास्पद असल्याचे नागरिकांतून बोलले जाते.

सुरूवातीला तालुकानिहाय “स्मार्ट एपिक कार्ड’ वाटप करण्यात आले, ज्या ठिकाणी तांत्रिक अडचणीमुळे कार्डचे वाटप करण्यात आले नव्हते, त्याठिकाणीही टप्प्याटप्प्याने कार्डचे वाटप होत आहे. लोकशाही, निवडणूक आणि मतदान याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासनाने स्मार्ट एपिक कार्डचे वाटप सुरू करून एक नावीन्यपूर्ण पाऊल उचलले आहे.

जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयात मोठ्या प्रमाणावर मतदार नावनोंदणी करण्यात आली. प्राचार्य यांच्यावर युवा मतदार नोंदणी आणि संबंधित भागाच्या मतदार यादीची संपूर्ण जबाबदारी होती. मतदार नोंदणी विशेष दुरुस्ती मोहीम आणि एकंदर निवडणूक कामकाज प्रक्रिया प्रबावीपणे राबविण्याच्या कामी सर्वतोपरी सहकार्य महाविद्यालयांकडून करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य यांनी आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मतदार म्हणून मतदार यादीत नोंदणी करण्याची खबरदारी चांगल्या प्रकारे घेतली होती. प्रत्येक महाविद्यालयात मतदार नोंदणी कक्ष स्थापन करण्यात आले होते. यासाठी जबाबदार प्राध्यापक मतदार नोंदणी करीत होते. शासनाने घेतलेला निर्णय चांगल्याप्रकारे यशस्वी झाला आहे. मतदार नोंदणीचे आयोजन यशस्वी करण्यासाठी सर्व नागरिक, सर्व राजकीय पक्ष, शासकीय कार्यालये, सहकारी संस्था यांनी मोलाचे सहकार्य केले आहे.

मजबूत, टिकाऊ ‘स्मार्ट एपिक कार्ड’

मागील 15 ऑगस्टपासून मतदारांना आधुनिक निवडणूक मतदार ओळखपत्र देण्यात येत आहे. जिह्यात आतापर्यंत दोन लाख 81 हजार 252 कार्डचे वाटप करण्यात आले आहे. हे स्मार्ट एपिक कार्ड आकर्षक, मजबूत, टिकाऊ, बारकोडसह पाण्याचे परिणाम न होणारे असणार आहे. मतदारांना हे केंद्र सरकारचे मिळणारे कार्ड कायमस्वरूपी ओळखपत्र म्हणून वापर करता येणार आहे. या कार्डचा कोणालाही गैरवापर करता येणार नाही.

मतदारसंघनिहाय एपिक कार्डचे वाटप

अकोले-21894, संगमनेर-27478, शिर्डी-17229, श्रीरामपूर-24110, नेवासा-13037, नगर-23399, शेवगाव-36589, राहुरी-18376, पारनेर-24686, श्रीगोंदे-23090, कर्जत-जामखेड 16260, राहाता-4719, कोपरगाव-35104 असे एकूण दोन लाख 81 हजार 252 स्मार्ट कार्डचे जिल्हा निवडणूक शाखेने वाटप केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)