#SLvENG 1st Test : इंग्लंडचा श्रीलंकेवर 211 धावांनी विजय

गाॅल – अचूक फिरकीच्या जोरावर इंग्लंडने मालिकेतील पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात यजमान श्रीलंकेचा 211 धावांनी पराभव केला आहे. विजयासाठी 461 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ दुसऱ्या डावात सर्वबाद 250 धावांच करू शकला. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात मोइन अलीने 4 , जैक लीचने 3 तर बेन स्टोकस आणि आदिल रशीद यांनी प्रत्येकी 1 गडी बाद करत इंग्लंड संघाला विजय मिळवून दिला.

दरम्यान,  इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या डावात इंग्लंडने सर्वबाद 342 धावा केल्या होत्या. त्यानंतर फलंदाजीस उतरलेल्या श्रीलंकेच्या संघाने पहिल्या डावात सर्वबाद 203 धावा केल्या. पहिल्या डावात इंग्लंडने 139 धावांची आघाडी घेत दुसरा डाव 6 बाद 322 धावांवर घोषित करत श्रीलंकेसमोर 461 धावांचे आव्हान ठेवले होते. दुसऱ्या डावामध्ये श्रीलंकेच्या एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. श्रीलंकेच्या एंजेलो मॅथ्यूजने सर्वाधिक 53 धावा केल्या. त्यामुळे श्रीलंकेचा संघ दुसऱ्या डावात 250 धावा करू शकल्याने त्यांना 211 धावांनी पराभव स्विकारावा लागला.

इंग्लंडच्या बेन फोक्स याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले . बेन फोक्स याने पहिल्या डावात 107 तर दुसऱ्या डावात 37 धाव केल्या.इंग्लंड संघाने तीन सामन्याच्या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)