महामार्गवरील स्कायवॉकचे काम अंतिम टप्यात

“गौरीशंकर’च्या विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण

सातारा – ग्वाल्हेर बंगळूर आशियाई महामार्गावर लिंब गावानजीक गौरीशंकर हे कॉलेज उभारण्यात आले असून याठिकाणी जिल्ह्यासह इतर भागातून हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी येत आहेत. या विद्यार्थ्यांना महामार्ग ओलांडताना मोठी कसरत करावी लागत होती. मात्र, आता नव्याने उभारण्यात आलेल्या स्कायवॉकमुळे विद्यार्थ्यांची ही कसरत थांबण्यात असल्याने विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पुणे बेंगलोर महामार्ग सातारा नजीक गौरीशंकर नॉलेज सिटी लिंब जवळ 90 लाख रुपये खर्चून उभारण्यात येत असलेला स्कायवॉकचे काम अंतिम टप्यात आले आहे.

येत्या 15 दिवसात या स्कायवॉकचे काम पूर्ण होईल, अशी माहिती महामार्ग प्रशासनाकडून देण्यात येत आहे.
निधी अभावी हे काम रेगाळले होते. यामुळे गौरीशंकर नॉलेज सिटीच्या शैक्षणिक संकुलामध्ये ज्ञान घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्याच्या सुरक्षितेचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला होता. याबाबत विविध वृत्तपत्रांनी रेगाळलेल्या स्कायवॉकचे काम तातडीने सुरु व्हावे याबाबतचे वृतही प्रसिध्द करुन प्रशासनाचे लक्ष वेधले होते. अखेर प्रशासनाने या वृत्ताची गंभीर दखल घेत स्कायवॉकचे काम सुरु केले आहे. सुरु झालेल्या स्कायवॉकच्या कामामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सुरक्षित ये जा करणे सोयीचे होणार आहे. यामुळे विद्यार्थी, पालक व संस्थेच्या प्रशासन मंडळाकडून समाधान व्यक्‍त केले जात आहे.

महाविद्यालय सुटल्यानंतर विद्यार्थी महामार्गावरुन रस्ता ओलाडताना दिसून येतात. यामुळे अपघात घडण्याची शक्‍यता अधिक असते. अपघात दुर्दैवी घटना घडू नये यासाठी स्कायवॉक निर्मिती करण्यात आलेली आहे. स्कायवॉकचे काम पुन्हा सुरु झाल्याने विद्यार्थ्यांचा प्रवास आता सुखकर होण्यास मदत होणार आहे.

श्रीरंग काटेकर , जनसंपर्क अधिकारी, गौरीशंकर नॉलेज सिटी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)