एसकेएफ इंडियाचा चमकदार ताळेबंद 

पुणे – तंत्रज्ञान पुरवठादार व बेअरिंग्ज, ल्युब्रिकेशन सिस्टीम्स आणि सेवा पुरवणारी कंपनी एसकेएफ इंडियाची दुसऱ्या तिमाहीत एकूण विक्री सात हजार 660 द्‌शलक्ष रुपयांची झाली. गेल्या वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीत ती सहा हजार 798 दशलक्ष रुपये इतकी होती. तिमाही विक्रीच्या तुलनेत या तिमाहीत त्यात 12.7 टक्के वाढ झाली आहे.

करोत्तर नफा 843 दशलक्ष रुपये असून गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत तो 740 दशलक्ष रुपये होता. त्यात 14 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मनीष भटनागर म्हणाले, या तिमाहीत आम्ही औद्योगिक आणि वाहनउद्योग बाजारपेठांमध्ये चांगली कामगिरी करत, लक्षणीय आर्थिक निकाल नोंदवले आहेत. संचालक मंडळाने शेअर बायबॅक प्रस्तावालाही मान्यता दिली असून, कंपनी 1.9 द्‌शलक्ष समभाग 2100 रुपये दराने खरेदी करणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)