“दशहरा’मध्ये स्कार्लेट विल्सन करणार आयटम सॉंग 

नील नितीन मुकेश आणि टीना देसाई यांच्या प्रमुख भूमिका असलेला “दशहरा’हा यावर्षातला सर्वात मोठा सिनेमा असणार असे बोलले जात आहे. नील नितीन मुकेशचा हिरो म्हणून हा पहिलाच मोठा सिनेमा असणार आहे. याशिवाय यामध्ये आणखी एक खास बात आहे ती म्हणजे “माई रे’ नावाचे एक आयटम सॉंग आहे. थंडीच्या दिवसात वातावरण हॉट करणारे हे गाणे सादर करणार आहे “बाहुबली’फेम स्कारलेट विल्सन. स्कारलेट विल्सनने यामध्ये अंग प्रदर्शन केल्याची चर्चा सुरू झाल्यामुळेच या गाण्याविषयीची उत्सुकता खूप चाळवली गेली आहे.

सिनेमाचे नाव जरी “दशहरा’ असले तरी त्या नावाला अनुसरून या आयटम सॉंगमध्ये काहीही विशेष असणार नाही. या गाण्याला रेखा भारद्वाज आणि मधुश्री यांनी गायले आहे. हे गाणे मुळात “दशहरा’ साठी नव्हतेच. हे गाणे “राजीज’मध्ये घेतले जाणार होते. मात्र काही कारणामुळे त्याचा समावेश “राजीज’मध्ये होऊ शकला नाही. “दशहरा’मध्ये प्रेक्षकांना इंटरेस्ट वाटू शकेल, अशी कोणती तरी कलाकृती असायला वाटल्याने त्यावर स्कार्लेट विल्सनचा परफॉर्मन्स बसवण्यात आला. आता स्कार्लेट विल्सनचा पहिलाच आयटम परफॉर्मन्स असल्यामुळे “दशहरा’पेक्षा हे गाणे बघायलाच प्रेक्षकांचा अधिक रस असेल. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)