नवाज शरीफ यांना सहा आठवड्यांचा जामीन

लाहोर – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना आरोग्याच्या कारणामुळे सहा आठवड्यांचा जामीन मिळाला असून त्यामुळे त्यांची आज सकाळीच कारागृहातून सुटका करण्यात आली आहे.आपल्याला योग्य ती वैद्यकीय सुविधा व उपचार घेता यावेत यासाठी आपल्याला जामीन मंजूर करावा अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली होती त्यानुसार न्यायालयाने त्यांना हा जामीन मंजूर केला आहे. त्यांची आज जामीनावर सुटका होणार याची माहिती मिळताच त्यांच्या शेकडो समर्थकांनी कोटलाखपत कारागृहा बाहेर गर्दी केली होती.

शरीफ यांना नंतर फुलाने सजवलेल्या मोटार कार मधून नेण्यात आले. त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी त्यांचे त्यांच्या घराजवळ स्वागत केले. शरीफ यांना हदयविकाराचाही त्रास असून त्यांना मध्यंतरी कारागृहातच हदयविकाराचा झटका येऊन गेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)