मेक्‍सिकोतील गोळीबारात 6 पोलिस ठार

मेक्‍सिको शहर: आपल्या काही सहकाऱ्यांना पोलिसांच्या तावडीतून सोडवून नेण्यासाठी गुंडांच्या एका बंदुकधाऱ्या टोळीने कारागृहातील पोलिसांवर गोळीबार केला त्यात सहा पोलिस ठार झाले. गुन्हेगारी टोळ्यांनी हल्ला करून इतका मोठा हिंसाचार करण्याची अलिकडच्या काळातील ही पहिलीच मोठी घटना आहे.

त्या राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की हल्लेखोर तीन वाहनांमधून आले होते त्यांनी हायवेवरच पोलिसांवर गोळीबार केला नंतर ते कारागृहाच्या जवळ पोहचले. तेथेही गोळीबार करून नंतर ते फरारी झाले. जाताना त्यांनी महामार्गावर अडथळे उभे करून पोलिसांचा पाठलाग टाळण्याचा प्रयत्न केला त्यात ते यशस्वी झाले. त्यांचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी पथके पाठवण्यात आली आहेत. तथापी या साऱ्या प्रयत्नांत त्यांच्या साथीदारांना सोडवण्यात ते यशस्वी झाले किंवा कसे हे मात्र समजू शकले नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)