मशिदीत घुसण्याच्या प्रयत्नातील 6 जणांना अटक

शबरीमला मंदिरातील महिला प्रवेशाच्या निषेधार्थ हिंदू कट्टरवादी संघटनेचा प्रयत्न

पलक्कड (केरळ) : शबरीमला मंदिराजवळील प्रसिद्ध वावार मशिदीमध्ये घुसण्याच्या प्रयत्नातील 6 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. धार्मिक गटांमध्ये तणाव निर्माण करणे आणि अतिक्रमण करण्याच्या आरोपाखाली या सहा जणांना अटक करण्यात आले आहे. या 6 जणांमध्ये तामिळनाडूतील 3 महिलांचाही समावेश असून हे सर्वजण
“हिंदू मक्कल काची’ या संघटनेचे सदस्य असल्याचे समजते आहे. काल रात्री प्रसिद्ध वावर मशिदीच्या दिशेने जात असताना त्यांना अटक करण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“वावर’ मशिद शबरीमला यात्रेशी संबंधित आहे. एरुमेली नयनार जुमा नावाची ही मशिद भगवान अय्यप्पाच्या मुस्लिम सहकाऱ्याच्या नावाने ओळखली जाते. अय्यप्पाचे भाविक नोव्हेंबर ते जानेवारीदरम्यानच्या वार्षिक यात्रेला येत असतात. ते मशिदीत प्रवेश करत नाहीत. पण प्रदक्षिणा आणि आवारात धार्मिक विधी करतात.

शबरीमला मंदिरात महिलांनी प्रवेश करण्याच्या निषेधार्थ “हिंदू मक्कल काची’ या संघटनेने मुख्यमंत्री पिनरयी विजयन यांच्याविरोधात निदर्शन केले होते. शबरीमलाप्रमाणे या मशिदीमध्येही महिलांना पाठवले जाईल, असे या संघटनेने जाहीर केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)