पाकिस्तानात सहा सैनिकांची हत्या

कराची – पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात इराणच्या सीमेनजिक दहशतवाद्यांनी केलेल्या दोन हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी लष्कराचे सहा जवान ठार झाले. यातील पहिला हल्ला पंजगुर जिल्हयात घडला त्यात चार सैनिक ठार झाले. हे सैनिक फ्रंटीयर कॉर्पसचे होते. दुसरा हल्ला लोरालाई भागात घडला त्यात दोन जवान मारले गेले.

जवान बेसावध असताना अचानक हल्ला करून या हत्या घडवण्यात आल्याची माहिती बलुचिस्तान प्रांताच्या सरकारच्या प्रवक्‍त्याने दिली.या प्रांताचे मुख्यमंत्री वसाय खान म्हणाले की या प्रांतातील शांतता आणि स्थैर्य धोक्‍यात आणण्यासाठी हे कृत्य घडवण्यात आले आहे. या लोकांना विकासाची प्रक्रियाही हाणून पाडायची आहे असे ते म्हणाले.

-Ads-

पाकिस्तानने पाळलेल्या दहशतवाद्यांनी अलिकडेच बलुचिस्तान सीमे नजिक इराणी सैनिकांवरही हल्ला करून 27 सैनिकांच्या हत्या केल्या होत्या. त्या प्रकरणानंतर इराणने पाकिस्तानवर जोरदार टीका केली होती. पाकिस्तान सरकारने दहशतवाद्यांना पाळण्याचे धोरण बंद करावे अन्यथा त्याचे गंभीर परिणाम त्यांनाही भागावे लागतील असे इराणने म्हटले होते. पाकने कारवाई केली नाही तर आम्ही पाकिस्तानी हद्दीत घुसून तेथील दहशतवाद्यांवर कारवाई करू असेही इराणने म्हटले आहे.

What is your reaction?
7 :thumbsup:
1 :heart:
1 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)