गुजरातमध्ये सरपंचपदाच्या वादात 6 ठार 

भुज  – गुजरातमध्ये सरपंचपदाच्या वादातील दंगलीत 6 जण ठार झाल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. कूच जिल्ह्यातील छासरा गावी मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली. छासरा सरपंचपदाच्या निवडणुकीत एक महिला उमेदवार विजयी झाली होती. या निवडणुकीनंतर एका गटातील लोकांनी त्याबाबत आकस धरला होता. मंगळवारी त्यावरून झालेला वाद चिघळला आणि दोन्ही गटातील लोकांनी परस्परांवर तीक्ष्ण शस्त्रांनी हल्ले केले.

या रणधुमाळीत एका गटाचे चार तर दुसऱ्या गटाचे दोन सदस्य मारले गेल्याची आणि दोन जण जखमी झाल्याची माहिती कूच (पश्‍चिम) चे पोलीस अधीक्षक एमएस भारदा यांनी दिली आहे. दोन जखमींपैकी एकाची अवस्था गंभीर असून त्याला अहमदाबाद येथील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. दंगा, खून आणि अन्य गुन्ह्यांवरून दोन्ही गटांतील सदस्यांवर एफआयआर दाखल करण्यात आला असल्याचे भारदा यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)