हुबळीजवळील भीषण अपघातात 6 ठार 

बंगळुरु – कर्नाटकमधील हुबळीजवळच्या राष्ट्रीय महामार्ग 63वर आज सकाळी भीषण अपघात झाला आहे. खासगी बस आणि ट्रकमध्ये झालेल्या धडकेत 6 जणांचा मृत्यू, तर 10 जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की, बसच्या मागील भागाचा संपूर्णपणे चुराडा झाला आहे. मृत प्रवासी मुंबईचे असल्याची माहिती मिळाली आहे.

अधिक माहिती अशी, शनिवारी पहाटे मुंबईहून निघालेली खासगी बस हुबळीजवळील राष्ट्रीय महामार्ग 63 वर असताना त्यांना वाळू वाहून नेणाऱ्या ट्रकने जोराची धडक दिली. यात बस उलटून रस्त्याच्या खाली कोसळली. यात 6 जण ठार झाले. अपघातात 10 जण गंभीर जखमीही आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस घटनास्थळी धाव घेत घटनेची नोंद करून घेतली आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)