बस दरीत कोसळून ६ ठार, तर ४५ जखमी

नाशिक – मोखाडा-त्र्यंबकेश्वर रोडवर एका खासगी बसला भीषण अपघात झाला असून या अपघातात ६ ठार तर ४५ जण जखमी झाले आहेत. तोरंगणा घाटात बस दरीत कोसळून हा अपघात घडला आहे. शिर्डी वरून डहाणूकडे जाताना या बसला अपघात झाला असून ब्रेक फेल होऊन बस दरीत कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे.

आज दुपारी मोखाडा त्र्यंबकेश्वर रोडवर तोरंगणा घाटात पालघरला जात असताना खाजगी बस २५ फुट दरीत कोसळली आहे. या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४५ जखमींना त्र्यंबकेश्वर येथील सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून बस दरीतून वर काढण्याचे काम सुरू आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)